राज्यशैक्षणीक

डिजिटल कामकाजामुळे वाढलेला शिक्षकांचा ताण तातडीने कमी होणे गरजेचे”

डिजिटल आदेशांचा ताण, शिक्षक दुहेरी संकटात

शिक्षकांवरील ऑनलाईन ताण कमी करण्याची शिक्षण क्रांती संघटनेची मागणीभिवंडी (ठाणे) : राज्यातील विविध विभागांतर्गत चालणाऱ्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांवर वाढत चाललेल्या ऑनलाईन कामांच्या ओझ्याबाबत शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.शासन अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळांना यूडीआयएसई, सरल, एसएचपीआर, ईको क्लब, निपूण महाराष्ट्र, दीक्षा आदी विविध पोर्टल्सवर माहिती भरावी लागते. या सततच्या ऑनलाईन कामांमुळे शिक्षकांच्या अध्यापनाच्या मूळ कार्याकडे दुर्लक्ष होऊ लागले असून त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.संघटनेच्या मते, शैक्षणिक वर्षभरात अनेक वेळा तसाच डेटा भरण्याची सक्ती अनावश्यक असून शिक्षक तणावाखाली जात आहेत. यातून अनेकांना मधुमेह, रक्तदाबासारखे आजार जडत असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे एकदाच, प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शाळांची माहिती ऑनलाईन भरावी, अशी शिफारस करून शिक्षकांना वारंवार होणाऱ्या डेटा अपडेटमधून दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.घागस यांनी म्हटले आहे की, “ऑनलाईन प्रणाली आवश्यक असली तरी तिचा अतिरेक शिक्षकांच्या अध्यापन क्षमतेवर परिणाम करीत आहे. शासनाने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून कामकाज सुलभ करावे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!