शैक्षणीक

नाशिकमध्येच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हजारो शिक्षकांची उभी फरपट – नेमकं कारण काय?

नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या कार्यमुक्ती प्रकरणाला आता धमाकेदार वळण मिळाले आहे.

नाशिक – राज्य शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीची ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पूर्ण झाली असून नाशिक जिल्ह्यात ३८५४ प्राथमिक शिक्षकांचे आदेश २१ ऑगस्ट २०२५ रोजीच निघाले होते. धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगावने तत्काळ कार्यमुक्ती देऊन शिक्षकांना नव्या शाळेत रुजूही करून घेतले. पण शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या स्वतःच्या नाशिक जिल्ह्यात मात्र आजतागायत एकाही शिक्षकाला कार्यमुक्ती नाही!हा प्रकार समोर येताच शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “राज्यात सगळीकडे कार्यमुक्ती आणि नाशिकात मात्र ठप्प”—असे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन देऊन बदलीपीडित शिक्षकांनी अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.शिक्षकांचे म्हणणे आहे की,पावणेदोन महिने आदेश निघून गेले तरी नाशिक प्रशासन टोलवाटोलवी करत बसले आहे.सतत अर्ज, विनंती, निवेदने देऊनही वेळकाढूपणा चालू आहे.बदलीमुळे कुठेही तोटा होत नसतानाही अडथळे उभे केले जात आहेत.दरम्यान, बदली कार्यमुक्ती समितीने ठाम इशारा दिला आहे की १७ ऑक्टोबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन पेटवले जाईल. विशेषतः बदली इच्छुक महिला शिक्षिका मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरतील.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले की संकलन परीक्षा सुरु असल्याने ही प्रक्रिया रोखली होती, मात्र “दिवाळीपर्यंत सर्वांना कार्यमुक्त करू” असे आश्वासन देण्यात आले आहे. तरीही शिक्षकांमध्ये नाराजी असून प्रश्न कायमच आहे — दादा भुसे यांच्या जिल्ह्यातच ४ हजार शिक्षकांची कार्यमुक्ती का अडकली?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!